Pat Sanstha

सहकार चळवळीचा उगम स्वंतत्र पूर्व कालात सन १८८९ साली बड़ोदा येथे "अन्योंयं सहकारी मंडली या नावाने सुरू झालाआजमितीस नागरी सहकारी पतसंस्था संख्या देशभरात ५०,००० पेक्षा जास्त असून महाराष्ट्र मध्ये २७,५०० इतकी नोंदविण्यात आल्या आहेत दरवर्षी पतसंख्याच्या संख्येत सुमारे २०वाढ होतेमहाराष्ट्र राज्य नागरी पतसंस्था महासंघा तर्फे प्राप्त झालेल्या माहितिनुसार २२,००० ते २४,००० कोटि रुपयांच्या ठेवी संकलित झाल्यामहाराष्ट्रामध्ये नागरी सहकारी पतसंस्थाच्या सभासदांची संख्या दोन कोटि सतरा लाखापेक्षा अधिक असल्याची माहिती उपलब्ध आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितिनंतर महाराष्ट्रात सहकारी चळवळ मोठ्या प्रमाणात विकसित झालीराजकीय महत्वाकांक्षा वा हव्यास नसलेल्या सहकारी क्षेत्रातील अनेक मान्यंवरानी या चळवळिसाठी फार मोठे योगदान दिले आहेत्यामध्ये कै.वैकूठाभाई मेहताडॉ.धनंजयराव् गाडगिल,पद्मश्री डॉ.विखे पाटिल वसंतदादा पाटिलरत्नापा कूम्भारतात्यासाहेब कोरेमधुकरराव देवलमाधवराव गोडबोले,यशवंतराव चव्हाण यांचा प्रामुख्याने उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.

हे सारे जरी खरे असेल तरी समाजातील सर्वात खालच्या स्तरातिल लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पतसंस्थाचे जाळे विणले गेले त्यातला बहुतांश संस्था आपले ऊदिष्ठ्य आणि उद्देश्य योग्य प्रकारे पूर्ण करताना दिसतात पण सद्यस्थितित पतसंस्थाचे भयानक वास्तव्य समोर येत आहेअनेक पतसंस्था अनेक कारणास्तव बंद पडल्या आहेतयात निराशाजनक शासकीय धोरनामुळे भरच पडली आहेपतसंस्था बंद होण्याच्या प्रमुख कारणांपैकी पहिले कारण म्हणजे थकित कर्जे होयदुसरे कारण मोठ्या प्रमाणात ठेवलेल्या नागरी सहकारी बन्केतिल ठेवी या ब्यानका बूडाल्यामूळे ठेविदारांचे झालेले नुकसान व त्यामूळे गमावलेली विश्वासहर्ता यामूळे पतसंस्थाचे भविष्य अंधकारमय झाले आहेसहकार भारतीने या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने विचार करूंन नागरी सहकारी बँका/सहकारी संस्था/पतसंस्था यांसाठी कराड येथे शासनमान्य प्रशिक्षण केंद्र चालवित आहेतसेच २००४ पासून पतसंस्था दैनंदिनिचेही प्रकाशन करित आहेयाच धर्तीवर मीरा-भाईंदरमध्ये केलेल्या पाहणीत शंभरच्यावर नोंदणीकृत पतसंस्था होत्या त्यापैकी बहुतेक पतसंस्था बंद झाल्या आहेत., व ज्य़ा चालू आहेत त्यांची स्थितिही फारशी समाधानकारक नाहीहे चित्र पालटविण्यासाठी अश्या बंद संस्थाना पुनर्जीवित करूंन त्या कार्यान्वित करण्याचा विड़ा उचललेला आहे.